Content Policy · सामग्री धोरण

Effective 2026-10-14.

  • फक्त खऱ्या कार्यक्रमांची खरी निमंत्रणं.
  • अश्लील, द्वेष पसरवणारं, धार्मिक भावना दुखावणारं, तोतयागिरी किंवा दुसऱ्याचा कॉपीराइट मोडणारं काहीही चालणार नाही.
  • फोटो-व्हिडिओसाठीच्या Google Drive लिंकमध्ये फक्त कार्यक्रमाचे, परवानगी असलेले फोटो ठेवा; आधार, PAN, बँक माहिती किंवा खाजगी कागदपत्रं नकोत.
  • पाहुण्यांकडे पैसे, UPI, OTP मागू नका आणि app / APK डाउनलोड करायला सांगू नका. आमची निमंत्रणं कधीच काही install करायला सांगत नाहीत.
  • लोकांची नावं, फोटो, फोन नंबर फक्त त्यांच्या परवानगीने; मुलांसाठी पालकांची परवानगी.
  • संस्थेचं निमंत्रण: अधिकार असेल तरच, सरकारी / अधिकृत नोटीस असल्यासारखं नको, प्रमुख पाहुण्यांची नावं त्यांच्या संमतीनेच. कोणत्याही निवडणुकीचा प्रचार किंवा मत मागणं नको.
  • नियम मोडल्यास निमंत्रण काढलं जाईल आणि गरज असल्यास कायद्यानुसार यंत्रणांना कळवलं जाईल.