Terms of Use · वापराच्या अटी

Effective 2026-10-14.

  • वापरण्यासाठी वय किमान 18 वर्षे हवं.
  • प्रकाशित निमंत्रण 7 दिवस live राहतं, नंतर त्यातली माहिती आणि फोटो आपोआप कायमचे delete होतात. संपादन केल्याने मुदत वाढत नाही.
  • प्रकाशित करताना तुमचं नाव, मोबाइल आणि ईमेल द्यावं लागतं. ते निमंत्रणात दिसत नाहीत, पण निमंत्रण delete झाल्यावरही आमच्याकडे राहतात.
  • निमंत्रणातील लोकांची (मुलांसाठी पालकांची) परवानगी घेणं आणि माहिती बरोबर असणं ही तुमची जबाबदारी.
  • कायदा किंवा आमचं धोरण मोडणारं निमंत्रण आम्ही न सांगता काढू शकतो. न्यायालय / सरकारी आदेशाने काढलेली माहिती कायद्यानुसार 180 दिवस जपून ठेवली जाते.
  • निमंत्रणात तुम्ही जोडलेल्या लिंक (उदा. फोटोंसाठी Google Drive फोल्डर) मध्ये काय share करता आणि ते कोण पाहू शकतं याची जबाबदारी तुमची.
  • संस्थेचं निमंत्रण फक्त संस्थेने अधिकार दिला असेल तरच प्रकाशित करा. ते अनौपचारिक निमंत्रण आहे: कायद्याने किंवा उपविधीने (bye-laws) आवश्यक असलेल्या सभेच्या नोटिशीची जागा घेत नाही. कोणत्याही निवडणुकीचा प्रचार (संस्थेच्या अंतर्गत निवडणुकीसह) करता येत नाही.
  • सेवा सध्या मोफत आहे. वाद Pune येथील न्यायालयांच्या कक्षेत.